

Satara District Security Review
सातारा : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युतर देण्यात आलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस मुख्यालयात जाऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्याच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला.
पोलीस यंत्रणेकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्या नंतर भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण आहे. विनाकारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसांनी सतर्क रहावे. वाहने सुव्यवस्थित ठेवावीत.
जिल्ह्यात सगळीकडे शांत वातावरण असून नागरिकांचा दैनंदिन दिनक्रम शांततेत व सुरळीत सुरु असल्याबाबतचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला
पोलीस मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपाधिक्षक (गृह) अतुल सबनीस, जिल्हा विशेष शाखचे पोलीस निरीक्षक रविंद्र सावंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.