Satara News | सातार्‍यात नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा

‘क्यूआर’ कोड जाहीर; सातारा पालिकेचा अभिनव उपक्रम
Satara News |
‘क्यूआर’ कोडPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरी केली जात आहे. सातारा नगरपालिकेने या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांची सूची ‘क्यूआर’ कोड आणि लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अभिनव उपक्रमामुळे सातारकरांना नगरपालिकेच्या सेवा मिळवणे अधिक सोयीचे झाले आहे.

राज्य शासनाने 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला. सर्वसामान्य नागरिकांना वेळेत व योग्य पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या अधिनियमाचा उद्देश होता. ठरावीक सेवांसाठी निश्चित कालावधीमध्ये सेवा पुरवावी, अन्यथा संबंधित अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी तरतूद आहे. गेल्या दहा वर्षांत या कायद्यामुळे शासकीय कार्यालयांतील कार्यपद्धतीत सकारात्मक बदल झाले आहेत.

नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या असून शासकीय कामात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढली आहे. सातारा पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध सेवांची यादी क्यूआर कोडच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक इच्छुक नागरिक आपल्या स्मार्टफोनमधून ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून नगरपालिकेने अधिसुचित केलेल्या सेवांची सूची पाहू शकतो. या यादीत विविध प्रकारच्या नागरी सेवा, दाखले, परवानग्या आणि प्रमाणपत्रांसाठी अवश्यक असलेली प्रक्रिया आणि त्यांची कालमर्यादा नमूद करण्यात आली आहे.

सातारा नगरपालिकेकडून अधिसुचति सेवांमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, मालमत्ता कराच्या दाखल्याची प्रत, पाणीपुरवठा कनेक्शन, विविध परवानग्या, विवाह नोंदणी यांसारख्या सेवांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक सेवेसाठी लागणारी कागपत्रे, शुल्क, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सेवा मिळवण्यासाठी लागणारा कालावधी स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

नागरिकांची वाढती डिजिटल साक्षरता लक्षात घेता सातारा पालिकेने ‘क्यूआर’ कोडचा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय ठरणार आहे. ‘फक्त एका क्लिकवर सेवा’ प्रत्यक्ष मिळणार आहे. ‘क्यूआर’ कोड किंवा लिंकवर क्लिक करून नागरिकांना थेट सेवांचे विवरण व अर्जपत्र मिळू शकतात. त्यामुळे कार्यालयात जाऊन फॉर्म मागवण्याचा किंवा तांत्रिक चौकशी करण्याचा त्रास कमी होणार आहे. सातारा पालिकेने भविष्यात आणखी काही सेवा पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. ‘माय सातारा’ हे अ‍ॅप सुरू केले असून त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन कर भरणा व इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येत आहे. डिजिटल सातारा हा या उपक्रमाचा हेतू असून प्रत्येक सेवा नागरिकांसाठी एका ‘क्लिक’वर आणण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news