Satara Accident : वर्येत अपघातात चिमुकल्याचा मृत्यू

वर्ये (ता. सातारा) येथील इयत्ता तिसरीमधील चिमुकल्याचा चारचाकी गाडीखाली येऊन झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

कण्हेर : वर्ये (ता. सातारा) येथील इयत्ता तिसरीमधील चिमुकल्याचा चारचाकी गाडीखाली येऊन झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या बालकाच्या एक्झिटमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे.

वर्ये (ता. सातारा) येथील चिमुकला समर्थ विजय निकम (वय ९ वर्षे) याचा एका मालवाहतूक गाडीखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास घडली. समर्थ हा अपत्‍यांमध्‍ये एकुलता एक मुलगा होता. तो हत्तीखाना येथील शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. त्याचे कुटुंबीय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्याच्‍या एका मोठ्या बहीणचा तीन ते चार वर्षांपूर्वी नदीत बुडून मृत्यू झाला होता.

चिमुकल्या समर्थचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून याबाबत अद्यापही पोलिसांमध्ये नोंद नाही. पुढील अधिक तपास तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील, तीन बहिणी, आजी, आजोबा व चुलते असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news