Satara Accident : भरधाव स्पोर्ट बाईकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कोंडवे (ता. सातारा) येथे सातारा-मेढा रस्त्यावर भरधाव स्पोर्ट बाईकची धडक
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

कण्हेर : कोंडवे (ता. सातारा) येथे सातारा-मेढा रस्त्यावर भरधाव स्पोर्ट बाईकने दिलेल्या धडकेत सोनाली श्रीकांत बोडके (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विघ्नहर्ता कॉलनीजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

बोडके या नणंद कल्याणी शंकर गोगावले यांच्यासोबत रस्त्याकडेला उभ्या होत्या. त्यावेळी साताऱ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्पोर्ट बाईकने त्यांना धडक दिली. यानंतर दुचाकी त्यांच्यावर पडली. ती उचलून दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात बोडके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांच्यासोबत असलेल्या गोगावले याही किरकोळ जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोडके यांना खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातातील दुचाकी हामदाबाज (ता. सातारा) येथील सुदान सोनवले (२२) हा युवक चालवत होता. तो साताऱ्याहून हिमालयन स्पोर्ट बाईकवरून गावी जात होता.याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.