

Satara Soldier Story
सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुट्टीवर असलेले सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले आणि युनिट मधून फोन आला अन् हळदीच्या ओल्या अंगाने तो ऑपरेशन सिंदूर साठी सीमेवर रवाना झाला आहे.
त्याच्या पत्नीने स्वतःच्या आनंद पेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पहिली देश सेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी जाण्यास परवानगी दिली.