Rapper Sambata: 'संबाटा'ला सातारकरांनी गार केले ‘गंमत’मध्ये

गांधी मैदानावर हातघाई; पोरं एकमेकांच्या अंगावर : हुर्येमुळे झाली चेंगराचेंगरी
Rapper Sambata
Rapper Sambata
Published on
Updated on

सातारा : यंदा सातार्‍यातील दहिहंडी अनेक कारणांनी गाजू लागली असून रॅपर संबाटामुळे गांधी मैदानावर हातघाई झाली. मराठीतील प्रसिद्ध रॅपर संबाटाला सातारकरांनी अक्षरशः ‘गंमत’मध्ये गार केले. स्‍टेजखाली उतरण्यावरुन पोरं एकमेकांच्या अंगावर गेली आणि गचांड्या धरल्‍याने तणाव निर्माण झाला. हा सारा प्रकार कारमधून पाहून संबाटा घाबराटला आणि तो खाली न उतरल्‍याने अक्षरश: हुर्ये होवून चेंगराचेंगरी झाली.

दहिहंडीचा सातार्‍यात दरवर्षीप्रमाणे जल्‍लोष पाहायला मिळाला. तालीम संघ व गांधी मैदान हे दहिहंडीचे मुख्य आकर्षण ठिकाण राहिले. गांधी मैदानावर सोमवारी संबाटा या रॅपरच्या प्रमुख उपस्‍थित दहिहंडीचा कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केला होता. तरुणाईमध्ये या संबाटाचे जबरदस्‍त आकर्षण आहे. यामुळे त्‍याला पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. सायंकाळनंतर राजवाडा परिसराला जत्रेचे रुप आले होते. तरुणाईने गांधी मैदान परिसर खचाखच भरुन गेला होता.

संबाटाचे सातार्‍यात आगमन होताच तरुणाई बेभान झाली. मुख्य स्‍टेजवर मुंगी जायला देखील जागा नव्‍हती. संबाटा हा सर्व प्रकार कारमधून पाहत होता. संबाटाला स्‍टेज मोकळे पाहिजे होते. स्‍टेज मोकळे झाल्‍यानंतरच कारमधून उतरणार असा पवित्रा त्‍याने घेतला. यामुळे स्‍टेज रिकामे करण्याची गडबड सुरु होताच अनेकांचा इगो दुखावला. इथचं वादाची ठिणगी पडली. वादावादीतून प्रकरण हातघाईपर्यंत एकमेकांना ढकलाढकली करुन हाणामारीलाही सुरुवात झाली.

सातार्‍यातील खुलेआम स्‍टेजवरील हा माहोल पाहून संबाटाला घाम फुटला. स्‍टेज मोकळे होईना, कारमधून उतरुन रस्‍त्‍यावर उतरुन जाताही येईना. यामुळे संबाटाने खाली न उतरण्याचा निर्णय घेतला. तरुणाई मात्र बेभान झाली होती. संबाटा कारमधून उतरत नसल्‍याने पोरं त्‍याच्या कारवर चढली. यामुळे परिसरात चेंगाराचेंगरी सदृश परिस्‍थिती निर्माण झाली. पोलिसांनाही ही परिस्‍थिती आवरणे अवघड होवून बसले होते.

कोण आहे संबाटा

संबाटा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी रॅपर आणि हिप-हॉप कलाकार आहे. तो त्याच्या राकट, स्पष्ट आणि वेगळ्या चॉपी फ्लो असलेल्या मराठी रॅपसाठी ओळखला जातो. 'पल्टी फायर', 'पिन्नक', 'कार्टे निबार,' 'सोड लाचारिचा पक्ष', 'हूडलाईफ' ही त्याची गाणी खूप गाजली आहेत. त्याने वयाच्या १४ व्या वर्षी रॅप करायला सुरुवात केली आणि मराठी भाषेमध्ये अस्सल रस्त्यावरील संस्कृती व संघर्षाचे वास्तव आपल्या गाण्यांतून मांडून देशाच्या हिप-हॉप जगतात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news