सातारा : ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

सातारा : ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दै. 'पुढारी' व गणेश बेकरी नांदणी यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2024 मध्ये घेण्यात येणारी 'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम' विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून या स्पर्धेकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची सहभागासाठी झुंबड उडाली. पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले असून दिवसेंदिवस मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत उतरु लागले आहेत.

'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम' चा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात धडाका सुरू आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व रूची निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून प्रश्नावलीला सुरूवात झाली. खटाव तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री यमाई श्रीनिवास विद्यालय, औंध, श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम स्कूल औंध, हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा वडूज,कात्रेश्वर विद्यालय कातरखटाव, महर्षी शिंदे विद्यालय एनकुळ आदी शाळांमध्ये विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाईल.

सहभागी होण्यासाठी येथे करा संपर्क

सातारा शहर व तालुका, कोरेगाव व खटाव तालुका : 9405207193.
माण, फलटण तालुका : 8805007204. वाई, जावली, महाबळेश्वर खंडाळा तालुका : 8805007268.कराड शहर, तालुका व पाटण तालुका : 9922913664.

दै.'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाममुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारिरीक विकासास निश्चितच चालना मिळण्यास मदत होणार आहे. 'पुढारी'ने राबवलेल्या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
– एस. बी. घाडगे, मुख्याध्यापक श्री.श्री. विद्यालय व राजा भगवंतराव ज्यु.कॉलेज, औंध

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news