सातारा; इम्तियाज मुजावर कोरेगाव तालुक्यातील अनेक भागात असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल आ.शशिकांत शिंदे यांनी आ.महेश शिंदेंवर टीका केली होती. सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. या टीकेला उत्तर देत असताना आ.महेश शिंदेंनी शशिकांत शिंदे यांची तुलना शोले पिक्चर मधल्या असरानी यांच्याशी केली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांची अवस्था शोले पिक्चर मधल्या असरानीं सारखी झाली आहे.
आधे इधर आधे उधर आणि बाकी मेरे पीछे आओ असे झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातले शशिकांत शिंदे हे असराणी असल्याची खोचक टीका यावेळी महेश शिंदे यांनी केली आहे. गेल्या 25 वर्षे सत्ता आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असून, सुद्धा ते या भागाचे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. आता खोटे आरोप करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील रामोशी वाडी आणि आजूबाजूच्या गावांचा आणि खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न मीच सोडविणार असल्याचा दावा देखील आ.महेश शिंदे यांनी केला आहे.
हेही वाचा :