Krishna Sugar Factory Karad | ‘कृष्णा’ कारखान्यासाठी 21 जूनला मतदान

सोमवार 18 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ, पुढील महिन्यात 23 जूनला होणार मतमोजणी
Krishna Sugar Factory Karad
Krishna Sugar Factory Karad
Published on
Updated on

सातारा : रेठरे बुद्रुक (ता. कराड, जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. सोमवार 18 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून पुढील महिन्यात 21 जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 23 जूनला मतमोजणी होणार आहे.

Krishna Sugar Factory Karad
'कृष्णा'ची निवडणूक १४ मे पूर्वी केव्हाही

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळख असलेल्या ‘कृष्णा’वर मागील 11 वर्षांपासून भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले चेअरमनपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलसमोर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलने आव्हान उभे केले आहे. तसेच ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांचे पुत्र माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांची भूमिका काय राहणार ? याकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Krishna Sugar Factory Karad
Dr. Suresh Bhosale‌ | ‘कृष्णा‌’ राज्यात अव्वलस्थानी असेल : डॉ. सुरेश भोसले

सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, पलूस, खानापूर तसेच सातारा जिल्ह्यातील कराड तालुका हे कारखान्याचे कार्यक्षेत्र असून सुमारे ५२ हजार मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

▪️ उमेदवारी अर्ज दाखल : १८ ते २२ मे

▪️ अर्ज माघार : २६ मे ते १ जून

▪️ मतदान : २१ जून

▪️ मतमोजणी : २३ जून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news