Satara Dussehra : साताऱ्यात आज शाही दसरा सोहळा; भवानी तलवारीला मानवंदना

साताऱ्यात आज शाही दसरा सोहळा: भवानी तलवारीला मानवंदना; वाद्यवृंदासह भव्य मिरवणूक
Satara Dussehra
साताऱ्यात आज शाही दसरा सोहळाPudhari File Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शिवपराक्रमावर पोवाडे, मर्दानी खेळ तसेच ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रशासनही सहभागी होणार आहे.

शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथे युद्धकला प्रत्यक्षिके सादर होणार आहेत. दुपारी ४ वाजता पोलिस वाद्यवृंद, मानवंदना पथक, पोवाडा समूह, मर्दानी खेळ पथकांचे खा. श्री. उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे आगमन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने भवानी तलवारीला मानवंदना दिल्यावर ही मिरवणूक जलमंदिर, राजवाडा, मोती चौक, राजपथमार्गे शिवतीर्थाकडे प्रस्थान करणार आहे. या मिरवणुकीत विविध वाद्यांसह घोडे, ऐतिहासिक वेशभूषा केलेले मावळे सहभागी होणार असून, हे या मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. या मिरवणुकीत खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले व प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता पालखीसोबत लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रितांचे शिवतीर्थ येथे आगमन होणार आहे.

त्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा समावेश असणार आहे. शिवतीर्थ येथे भवानी तलवारीचे आगमन झाल्यावर येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर भवानी तलवारीचे जलमंदिरकडे प्रस्थान होणार आहे. जलमंदिर येथे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि परिवाराचा नागरिकांसोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. या शाही सीमोल्लंघन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Satara Dussehra
किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा. ‘जय भवानी… जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news