Dr. Smita Jadhav : साताऱ्यात डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा निर्धार

भाजपसह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले : बैठकांचा धडाका
Dr. Smita Jadhav : साताऱ्यात डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा निर्धार
Published on: 
Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या विजयाचा निर्धार करत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. प्रचारासाठी महायुतीतील भाजपसह सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यादृष्टीने साताऱ्यात बैठकांचा धडाका सुरू आहे.

मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर तालुक्यातही ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातूनही प्रचाराचे नियोजन सुरू आहे. पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने संपर्क मोहीम राबवली जात आहे. मतदारांशी संवाद साधणे, प्रचाराचे नियोजन करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवणे यावर भर दिला जात आहे. विविध टीममधील जबाबदाऱ्यांचे योग्य नियोजन करून प्रचाराची दिशा निश्‍चित केली जात आहे.

ताकदीने निवडून आणणारच...

डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह विविध टीम सक्रिय झाल्या आहेत. उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून डॉ. स्मिता जाधव यांना बहुमताने विजय करणारच. त्याचबरोबर शिक्षक मतदार संघातील काैस्तुभ गावडे यांनादेखील निवडून आणणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. दोन्ही उमेदवार ताकदीने व बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news