Dr. Smita Jadhav : खा. उदयनराजेंच्या शुभेच्छा म्हणजे छत्रपती शिवराय आणि जिजाऊंचे आशीर्वाद : डॉ. स्मिता जाधव

डॉ. स्मिता जाधव शनिवारपासून सातारा जिल्हा दौर्‍यावर
Dr. Smita Jadhav
निवडणूक जाहीरनामा प्रकाशनप्रसंगी खा. उदयनराजे भोसले, डाॅ. स्मिता जाधव, चित्रलेखा माने-कदम, तेजस्विनी घोरपडे, सुनेशा शहा, तेजस्विनी दुर्गे, वैशाली भिलारे, सुषमाराजे घोरपडे व इतर. (छाया : देवराज कामाठी)
Published on: 
Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातून मतदारांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पदवीधरांसाठी उत्तम व्हिजन घेऊन काम करणार आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विजयाची शाल आणि बुके दिला. त्यांच्या या शुभेच्छा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊंचे आशीर्वाद आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदासंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या शनिवारपासून सातारा जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांनी शनिवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी जि. प. चे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरण समिती सदस्य काका धुमाळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, सातारा जिल्हा चिटणीस नितीन कदम, सातारा शहर सरचिटणीस विक्रम बोराटे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अक्षय भोसले, सातारा शहर (बाह्य) अध्यक्ष वैशाली टंकसाळे, नगरसेविका रीना भणगे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनेशा शहा, तेजस्विनी दुर्गे उपस्थित होते.

पत्रकारांनी खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या विजयी शुभेच्छांबद्दल विचारले असता डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, मला विजयाची शाल आणि बुके खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्यामुळे खूप आनंद झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांनी जणू आशीर्वाद दिले आहेत. पदवीधर मतदारसंघात नक्कीच उत्तम काम करीन. पदवीधरांच्या विश्वासाला पात्र ठरेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

पदवीधर मतदारसंघासाठी काय व्हिजन असेल, असे विचारले असता डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, पदवीधरांच्या आर्थिक प्रगतीसाठी व उन्नतीसाठी अधिक चांगले काम करायचे आहे. पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे. पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सातारा पालिकेचे शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, नगरसेवक मनोज शेंडे, ॲड. विनित पाटील, सुधाकर यादव, विनोद मोरे, प्रशांत आहेरराव, सागर पावसे, पंकज चव्हाण, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, अपर्णा बाचल, शारदा वाघमोडे, विमल गोसावी, भारती शिंदे, वैशाली राजेभोसले, आशा डगळे, अनिता फरांदे, हेमलता भोसले, माजी सभापती सविता फळाके, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, विजय बडेकर, माजी नगरसेवक किशोर पंडित, सागर भोसले उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news