

Satara Sandalwood Theft Arrest
सातारा : धामणी येथील चंदनाची झाडे चोरणाऱ्या चंदन चोरांना अटक करण्यात आली. म्हसवड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार 400 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धामणी येथील चंदनाची झाडे चोरणाऱ्या चंदन चोरांना अवघ्या दोन तासांत अटक करून 1 लाख 10 हजार 400 रुपये किमतींचा मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी उमाजी उत्तम चव्हाण (रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा), प्रमोद आण्णा धोत्रे (रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी वाघमारे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, संजय आस्वले, विनोद सपकाळ, श्रीकांत सुद्रिक, राहुल थोरात, संतोष काळे, महावीर कोकरे यांनी केली.