Satara DCC Bank Election | जिल्हा बँक ठरावासाठी वाढली चुरस

सातारा तालुक्यातही वातावरण तापले; ठराव प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात
Satara DCC Bank
Satara DCC Bank Pudhari photo
Published on
Updated on

सातारा :

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची ठराव प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावागावांत मतदानाचा ठराव कोणाच्या बाजूने होणार, यावरून विविध गटांमध्ये जोरदार चुरस पहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

Satara DCC Bank
Satara News : शाहूपुरी पोलिसांकडूनही डीजेंवर गुन्‍हे

सातारा तालुक्यात या प्रक्रियेसाठी ५५१ संस्था पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत २३२ संस्थांचे ठराव सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहेत. अजून ३१९ ठराव येणे बाकी आहेत. मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट असल्याने आता दोन दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

प्राप्त ठरावांमध्ये १२६ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, ४२ नागरी सहकारी पतसंस्था, २५ विविध कृषी व इतर उत्पादन संस्था, तसेच ३२ औद्योगिक, मजूर, ग्राहक, पाणीपुरवठा व इतर विविध संस्थांचा समावेश आहे. उर्वरित विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे ठराव अंतिम टप्प्यात आहेत. ठराव प्रक्रियेदरम्यान सातारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संस्थांमधील मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विविध गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्यमान समीकरणांना धक्का बसत आहे. काही संस्थांमध्ये मतदार प्रतिनिधी ठरवताना मोठी चुरस निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर राजकीय उलथापालथी घडताना दिसत आहेत. ५ ऑगस्टनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पुढील रणनीती याच ठरावांवर अवलंबून राहणार आहे.

Satara DCC Bank
Satara News : शाहूपुरी पोलिसामुळे चेन स्‍नॅचर ‘सुटला’

तालुक्यात राजकीय समीकरणांचा दहिकाला

सातारा तालुक्यातील गावे सातारा-जावली, कोरेगाव आणि कराड उत्तर अशा तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागली गेली आहेत. बहुतांश गावांवर खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले या दोन बंधूंचे राजकीय वर्चस्व आहे. आ. महेश शिंदे आणि आ. मनोजदादा घोरपडे यांचेही राजकीय वर्चस्व त्यांच्या मतदारसंघांतील गावांमध्ये वाढलेले आहे. त्यामुळे राजैसोबतच या दोन आमदारांच्या कार्यकत्यांमध्येही राजकीय इच्छाशक्ती वाढली असून तालुक्यात राजकीय समीकरणांचा दहिकाला पहायला मिळतो आहे.

वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांत स्पर्धा

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे मोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांमध्येही मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. गावोगावी कार्यकर्ते संस्थांचे ठराव आपल्या गटाच्या बाजूने व्हावेत, यासाठी सक्रिय झाले असून, अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उमे ठाकल्याचे चित्र आहे. सर्व ठराव स्पष्ट झाल्यावर सातारा तालुक्यातील राजकीय ताकद नेमकी कोणाच्या पारड्धात आहे, याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news