

Satara Municipal Survey
सातारा : साताऱ्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे सातारा पालिकेने केला आहे. या सर्वेत सुमारे ३०० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. संबंधित घरमालकांना बांधकाम विभागाने नोटीस दिली आहे. धोकादायक इमारत उतरवून घ्यावी. जीवितहानी झाल्यास जबाबदार धरले जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
साताऱ्याच्या पश्चिम व मध्यवर्ती भागात अनेक जुन्या इमारतींचे वय ५० ते ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. काही ठिकाणी इमारतींची अवस्था इतकी जीर्णझाली आहे की, कोणत्याही क्षणी त्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने यावर्षी शहरात पाहणी करून ३०० इमारतींची यादी तयार केली आहे. त्या सर्व इमारतींना अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.