सातारा : पब्जी गेममधील ओळखीनंतर अत्याचार

सातारा : पब्जी गेममधील ओळखीनंतर अत्याचार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पब्जी या ऑनलाईन गेमवर ओळख झाल्यानंतर उत्तर प्रदेश राज्यातील युवकाने सातार्‍यातील अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सातार्‍यातील भारत रेसिडेन्सी या लॉजवर मुलीवर अत्याचार झाले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित उवैश अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलगी ऑनलाईन पब्जी गेम खेळत होती. त्यातूनच संशयित उवैश याच्यासोबत तिची सप्टेंबर 2021 मध्ये ओळख झाली. या ओळखीतून संशयित उवैश हा उत्तर प्रदेशातून मुलीला भेटण्यासाठी सातार्‍यात आला. पहिल्या भेटीत त्याने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर उवैश याने वारंवार व्हिडीओ कॉल करून त्यावर अश्लील फोटो पाठवण्याची धमकी दिली. या सर्व घटनेने मुलगी घाबरली.

मुलगी घाबरल्याचे पाहून त्याचा गैरफायदा घेत उवैश हा फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा मुलीला भेटण्यासाठी आला. यावेळी त्याने सातार्‍यातील भारत रेसिडेन्सी लॉज येथे तिच्यावर अत्याचार केले. यावेळी उवैश याने मुलीचा अश्लिल व्हिडीओ बनवला व त्याची धमकी देत ऑगस्ट महिन्यात पुन्हा त्याच लॉजवर अत्याचार केले असल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित उवैश याने अधिक त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर मुलीने कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार दीड वर्षानंतर मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news