सातार्‍याच्या पोलिस अधीक्षकपदी समीर शेखच

पठारे यांची मुंबईला बदली : प्रक्रियेला पूर्णविराम
 SP Sameer Shaikh
एसपी समीर शेखPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची 20 दिवसांपूर्वी अचानक बदलीचे आदेश होऊन नूतन एसपी म्हणून डॉ. सुधाकर पठारे यांचे नाव पुढे आले. मात्र, या आदेशानंतर अवघ्या तीनच तासात बदलीला ब्रेक लागला व समीर शेख थांबले. गुरुवारी रात्री पुन्हा याबाबत गृह विभागाने पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढत एसपी डॉ. सुधाकर पठारे यांची बृहन्मुंबई येथे बदली केली. त्यामुळे सातार्‍यात पोलिस अधीक्षकपदी समीर शेखच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 SP Sameer Shaikh
एसपी समीर शेख यांना विशेष सेवा पदक

एसपी समीर शेख यांची नोव्हेंबर 2022 मध्ये गडचिरोली येथून सातार्‍यात बदली झाली आहे. सातार्‍यात धडाकेबाज कामगिरी सुरु असताना दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची बदली मुंबई येथे झाल्याचे आदेश झाले. वास्तविक नोव्हेंबर 2024 ला त्यांचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना तत्पूर्वी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त झाले. बदलीचे आदेश आल्यानंतर अवघ्या तीन तासातच हे आदेश थांबवण्यात आले. पुढील आदेश होईपर्यंत सातारा एसपींनी जिल्हा सोडू नये, असे गृहविभागाच्या आदेशात म्हटले. या नाट्यमय घडामोडीनंतर सातार्‍यासह राज्य पोलिस दलात याची चर्चा रंगली.

 SP Sameer Shaikh
सातारा : पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्र्याचे पदक जाहीर

20 दिवसानंतर गृहविभागाने गुरुवारी राज्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यामध्ये एसपी डॉ. सुधाकर पठारे यांची सातारा ऐवजी बृहन्मुंबई येथे बदली झाली असल्याचे आदेशात म्हटले आहे. सातारच्या पोलिस दलाच्या इतिहासात असे प्रथमच घडले. एखाद्या पोलिस अधीक्षकाची बदली होते ती अवघ्या तीन तासात थांबते व पुढे तीच पोस्टींग राहते. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजेल. तसेच आता सण-उत्सवांना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक पार पाडल्यानंतर आता विधानसभा निवडणूका शांततेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा प्रयत्न राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news