

पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावासाचे धुमशान सुरूच आहे. दरम्यान २ आणि ३ ऑगस्टला पुणे आणि साताऱ्यात अतिवृष्टी तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, आज २ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि उद्या ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्याला रेड अर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील पुण्यामध्ये आज तर साताऱ्याला २, ३ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात आजपासून मंगळवार ६ ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील 3-4 दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. देशात संपूर्ण छत्तीसगड (२ ऑगस्ट), पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र (२, ३ ऑगस्ट), पश्चिम मध्य प्रदेश (३, ४ ऑगस्ट), गुजरात, कोकण आणि गोवा (३ ऑगस्ट) रेड अलर्ट आहे. तसेच पूर्व राजस्थानला देखील ४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.