सातारा : बामणोलीत पावसाला सुरूवात; ‘शिवसागर’च्या पाणी पातळीत वाढ

सातारा : बामणोलीत पावसाला सुरूवात; ‘शिवसागर’च्या पाणी पातळीत वाढ

अँकर; पुढारी वृत्तासेवा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बामणोलीसह कांदाटी, खोरे तापोळा या परिसरात पावसाने बऱ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. यामुळे शेतीच्या कामासह पर्यटन देखील खुलू लागले आहे.

मुसळधार पाऊस अद्याप सुरू जरी झाला नसला तरी अधून मधून धो धो कोसळणाऱ्या पावसाने ओढे नाले प्रवाहित होऊन खळखळून वाहू लागले आहेत. त्यामुळे शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत दिवसागणित एक ते दोन फुटाने वाढ होत आहे. कोरड्या नदीपत्रात उभ्या असणाऱ्या बोटी आता नदीपात्रात गेल्याने दळणवळण देखील सुरू झाले आहे.

मुसळधार पाऊस सुरू झाल्याने लवकरच शिवसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बोटिंग व्यवसाय सुरू होऊन या भागातील पर्यटन खुलणार आहे. पर्यटन खुलल्याने या भागातील लोकांना आर्थिक लाभ मिळणार असून रोजगार निर्मिती सुरू होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news