सातारा : ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

सातारा : ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' या शैक्षणिक उपक्रमाचा सर्वत्र धडाका सुरू आहे. सातारा शहरातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी 'पुढारी'च्या या शिष्यवृत्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा-शाळांमधून नोंदणीसाठी झुंबड उडत आहे. 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' या शिष्यवृत्ती परीक्षा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला चालना तर मिळणार आहेच पण बक्षिसांचाही खजाना लुटता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची आवड व रूची निर्माण व्हावी यासाठी दै. 'पुढारी' व गणेश बेकरी नांदणी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या 'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम या शैक्षणिक उपक्रम प्रसाराचा सातारा शहरात धडाका आहे. आण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय, श्रीपतराव पाटील विद्यालय करंजे, न्यू इंग्लिश स्कूल करंजे, कन्या विद्यालय, आदर्श विद्यालय, करंजे, गोकुळ प्राथमिक शाळा, शाहू अ‍ॅकॅडमी, लोकमंगल हायस्कूल, यशोदा स्कूल, साधना इंग्लिश मीडियम स्कूल, गोडोली शाळा नं. 23 आदी विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हात उंचावून 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम'ला प्रतिसाद दिला.
दै.'पुढारी'तर्फे जानेवारी 2024 मध्ये 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' घेण्यात येणार आहे. राज्य व केंद्र पातळीवरील शिष्यवृत्ती, राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून याबाबत विद्यार्थ्यांना शाळा-शाळांमध्ये जावून माहिती दिली जात आहे. परीक्षा मराठी व सेमी इंग्लिश माध्यमांच्या शाळांसाठी असेल.

प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे. पेपर 1- मराठी + गणितसाठी 75 प्रश्न व 150 गुण असतील. हा पेपर 11 ते 12.30 यावेळेत होईल. पेपर 2- इंग्रजी + बुध्दीमत्ता 75 प्रश्न व 150 गुण असणार आहेत. दुपारी 1.30 ते 3 याकालावधीत पेपर होईल. परीक्षा एकूण 300 गुणांची असणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सहभाग शुल्क 125 रुपये असणार आहे.

जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाईल. दोन विद्यार्थ्यार्ंंना समान गुण मिळाल्यास पेपर दोनमध्ये जास्त गुण असतील तो पहिला असेल. त्यातही समान गुण असल्यास लहान वय असणारा विद्यार्थ्यास पहिला क्रमांक दिला जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट असणार आहे.
या उपक्रमातील सहभागासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सातारा शहर व तालुका, कोरेगाव व खटाव तालुका 9405207193. माण, फलटण तालुका 8805007204. वाई, जावली, महाबळेश्वर व खंडाळा तालुका 8805007268. कराड शहर, तालुका व पाटण तालुका 9922913664.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news