सातारा : वाचकांच्या मनावर गेली 75 वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे दै. ‘पुढारी’ सातारा व कराड शहरांतील वाचकांसाठी ‘मान्सून धमाका’ ही हमखास बक्षीस योजना घेऊन आले आहे. सातारा व कराड शहरांतील वाचकांवर तब्बल वीस हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. सहा महिन्यांतच हमखास बक्षिसांसह लकी ड्रॉमार्फत एक नशिबाचे बक्षीस जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे, तीही बुकिंग रकमेशिवाय उपलब्ध होणार आहे.
दै. ‘पुढारी’ म्हणजे सातारा आणि सातारा म्हणजे ‘पुढारी’ असे वर्षानुवर्षांचे अतूट नाते आहे. हेच सूत्र कराड येथेही लागू आहे. पत्रकारिता आणि सार्वजनिक क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केलेला ‘पुढारी’ वाचकांचा खरा आधारस्तंभ आहे. वाचकांच्या समस्यांना वाचा फोडत, त्यांना न्याय मिळवून देण्यात ‘पुढारी’ची सातत्याने आग्रही आणि अग्रणी भूमिका राहिली आहे. शहराच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘पुढारी’ने वाचकांच्या भूमिकेला बळ देत, तो प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले. यातूनच वाचक आणि ‘पुढारी’ची असलेली वीण दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे.
वाचकांच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक लढ्यात पुढे असणारा ‘पुढारी’ वाचकांनाही भरभरून देण्यात नेहमीच अग्रसेर राहिला आहे. त्यातूनच ‘पुढारी’ परिवाराने शहरातील वाचकांसाठी ‘मान्सून धमाका हमखास बक्षीस योजना’ आणली आहे. या योजनेंतर्गत शहरातील वाचकांसाठी तब्बल एक कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सहा महिन्यांसाठी ही योजना राहणार आहे.
या योजनेच्या बक्षिसांसाठी एक-दोन वर्षे वाट पाहायची गरज नाही. केवळ सहा महिन्यांत एक हमखास बक्षीस वाचकांना मिळणारच आहे. यासह लकी ड्रॉमधूनही आणखी एक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेतील सहभागी प्रत्येक वाचकाला सहा महिन्यांत एक हमखास बक्षीस मिळणार आहे. तक्ता जमा करतेवेळी सहभागी सर्वच वाचकांना बाथरूम सेट हे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून एक नशिबाचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांना जवळच्या अंक विक्रेत्यांकडे आपली मागणी नोंद करावी. दि. 18 ऑगस्ट 2024 पासून अंकात प्रसिद्ध होणार्या दैनंदिन कूपनांपैकी 150 इतकी कूपन्स जमा करून तक्त्यात चिकटवून ती जमा करावी लागणार आहेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांना कोणत्याही प्रकारचे बुकिंग करण्याची, त्याकरिता आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही. केवळ दररोज प्रसिद्ध होणारा दै. ‘पुढारी’ आपल्या घरी असणे आवश्यक आहे.