प्रतापगड संवर्धनाला मिळणार चालना

मुख्यमंत्र्यांकडून प्राधिकरणाचा जीआर जारी : 150 कोटींमुळे कामांना गती
Pratapgarh conservation will get a boost
प्रतापगड संवर्धनाला मिळणार चालनाPudhari Photo
Published on: 
Updated on: 

रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय शुक्रवारी राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडाच्या जतन व संवर्धनाला चालना मिळणार आहे. प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाला 150 कोटी रुपये दिल्याने किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाबरोबरच विविध विकासकामे व डागडुजीच्या कामांना वेग येणार आहे.

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.1656 मध्ये करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखान याचा वध दि. 10 नोव्हेंबर 1659 साली याच किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या शिताफीने केला होता. महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तू स्थापत्याचे उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी भारत सरकारकडून युनेस्कोला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामध्ये प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. यापूर्वी रायगड किल्ल्यासाठी शासनाने रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखडा प्राधिकरण स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

Pratapgarh conservation will get a boost
अजिंक्यतारा, प्रतापगड, सज्जनगडावर रोप वे

प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन आराखड्यातील शासनाने मंजूर केलेल्या कामाच्या अंदाजपत्रकांना व नकाशांना मान्यता देणे, प्राप्त निधी, आर्थिक स्त्रोतांचे वाटप, प्रतापगड किल्ला विकासाच्या मान्यता दिलेल्या आराखड्याप्रमाणे निधीचे पुनर्वाटप व पुनर्रचना करणे, कामाच्या प्रगतीचे संनियंत्रण, प्रकल्पांतर्गत निर्माण केलेले विविध घटक कार्यान्वीत करणे ही प्राधिकरणाची कार्यकक्षा व अधिकार कक्षा असणार आहे. प्राधिकरणाची दर महिन्याला बैठक आयोजित केली जाणार आहे. नियमीत बैठक आयोजित करणे शक्य नसल्यास चक्रीय पध्दतीने मान्यता घेवून निर्णय घेण्यात येणार आहेत. प्राधिकरणास आवश्यकता असल्यास संबंधित अधिकारी किंवा तज्ञांना बैठकीस विशेष निमंत्रीत म्हणून बोलावण्यात येणार आहे.

Pratapgarh conservation will get a boost
अजिंक्यतारा ‘प्रतापगड’ला उभारी देणार

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राधिकरणासाठी निधी उपलब्ध होणार आहे. पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 381.56 कोटी रकमेच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रतापगड किल्ला जतन व संवर्धनासाठी 127.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या आराखड्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समित्यांचे प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन संबंधातील कामकाज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण पाहणार आहे.

मूल्यमापन व सनियंत्रण कक्षाची स्थापना

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणांतर्गत कामांच्या अंमलबजावणी करता प्रकल्प नियोजन व मूल्यमापन संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागातील निवृत्त तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ अधिकारी, पुरातत्त्वशास्त्र, बांधकाम वारसा, मध्ययुगीन इतिहासाचे सल्लागार सदस्य, वास्तुविशारद संवर्धन, स्थापत्य अभियंता, पुरातत्त्वशास्त्र अभियंता, तांत्रिक समन्यवयक, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक, शिपाई अशी 15 पदे भरण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news