अजिंक्यतारा ‘प्रतापगड’ला उभारी देणार

अजिंक्यतारा ‘प्रतापगड’ला उभारी देणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामुळे सभासद, शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधली गेली आहे. जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. जावलीतील शेतकर्‍यांना आर्थिक उन्नती मिळवून देण्यासाठी अजिंक्यतारा प्रतापगड कारखान्याला उभारी देईल, असे प्रतिपादन संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

अजिंक्यतारा कारखान्याच्या सभेत ते बोलत होते. यावेळी अजिंक्यताराचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, माजी जि.प उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत व मान्यवर उपस्थित होते. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सहकारी तत्त्वावरील प्रतापगड सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालण्यास सभासदांनी मंजुरी दिल्यानंतर प्रतापगड कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

जावली तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून या तालुक्यातील शेतकर्‍यांचा हक्काचा कारखाना पुन्हा सक्षमपणे सुरु करून देणे आवश्यक आहे. जावलीतील शेतकरी बांधवांच्या पाठीशी अजिंक्यतारा कारखाना खंबीरपणे उभा आहे. प्रतापगड कारखाना सुरु करून शेतकर्‍यांची चिंता दूर करण्याचे काम लवकरच केले जाईल, अशी ग्वाहीही आ. शिवेंद्रराजेंनी दिली.

सभेला माजी जि.प. सदस्य प्रतीक कदम, माजी पं. स. सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, सूर्यकांत धनवडे, रविंद्र कदम, धर्मराज घोरपडे, अरविंद चव्हाण, दादा शेळके, गणपत शिंदे, दिलीप फडतरे, सुनील काटे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक अजित साळुंखे, पंडितराव सावंत, शिवाजी सावंत, गणपत मोहिते, यांच्यासह सभासद उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news