Satara Crime : कृष्णा नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह सापडला

चार दिवसापूर्वी घडली होती घटना; सांगली पथकाची मदत
Satara Crime News
कृष्णा नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह सापडलाFile photo
Published on
Updated on

कराड : कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी सापडला. प्रियांनी अशोक कुंभार (वय 19, रा. कापिल, ता. कराड) असे त्या युवतीचे नाव आहे.

Satara Crime News
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

गुरुवार, 1 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता प्रियांनी कुंभार हिने नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतली होती. पुलाजवळ तिची चप्पल व बॅग आढळून आल्याने नागरिकांनी कराड शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला होता. मात्र पहिल्या दिवशी यश आले नाही. त्यानंतर कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहिम सुरू ठेवण्यात आली होती. दोन दिवसांनंतर शनिवारी सांगली येथील आयुष हेल्पलाईन पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र मृतदेह सापडला नव्हता. रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Satara Crime News
Shocking Crime news | आई, वडिलांनी मुलाला चक्क साखळदंडाने बांधले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news