माऊलींच्या स्वागतासाठी फलटणचा महावितरण विभाग सज्ज

महावितरण विभागाची सर्व कामे अंतिम टप्प्यात
Power distribution company workers installing covers on transformers.
ट्रान्स्फॉर्मरला कव्हर बसवताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी.Pudhari Photo

फलटण, पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणचा महावितरण विभाग सज्ज झाला असून, पालखी महामार्गावरील व शहरातील वीज वितरणाची आवश्यक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षेच्या द़ृष्टीने कर्मचार्‍यांची फौज तैनात केली असल्याची माहिती फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय व अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, सहाय्यक अभियंता शरद येळे यांनी दिली.

Power distribution company workers installing covers on transformers.
Ashadhi Wari 2024| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा

गत पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस वीज वितरणचे कर्मचारी काम करत आहेत. पालखी मार्गावरील लोखंडी पोलच्या सपोर्टसला पीव्हीसी पाईप बसवणे, वाहतुकीच्या मार्गावर असलेल्या 9 ट्रान्स्फॉर्मरला कव्हर बसवणे ज्यामुळे ट्रान्स्फॉर्मर फुटल्यास गरम ऑईल गळतीमुळे कोणालाही इजा होण्याची शक्यता कमी झाली आहे. याशिवाय एलटी लाईनला 1200 स्पेंसर बसवले, 27 स्वीचची दुरुस्ती, 3 नवीन स्विच बसवले, 32 डीपीच्या बॉक्सची दुरुस्ती, 42 ठिकाणच्या तारा बदलण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा व मुक्कामाच्या ठिकाणी वीज पुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वीज वाहिनी किंवा वीज यंत्रणेतून वीज चोरी करू नये. आकडा टाकून वीज घेऊ नये. वीज जोडणीसाठी योग्य क्षमतेच्या व सुरक्षित वायरचा वापर करा. महावितरणकडून मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ देण्याची व्यवस्था केली असल्याचेही प्रकाश देवकाते यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news