

सातारा : आज महाबळेश्वर मध्ये पावसाने धँवाधार बॅटिंग केली आहे, जवळपास दोन तास सलग मुसळधार पाऊस पडल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाले, त्याचबरोबर या पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले, गटारे तुंबल्याने महाबळेश्वर मधील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
यामुळे जिल्ह्यासह राज्यातून आलेले पर्यटक वैतागलेले पाहायला मिळाले, त्याचबरोबर या रस्त्यावर आलेल्या पाण्यात गाड्या काही ठिकाणी बंद पडल्या आणि वाहतूक कोंडी देखील झाली, वेळीच प्रशासनाने महाबळेश्वर मध्ये लक्ष घालून योग्य ती उपायोजना करून पर्यटकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी पर्यटक करताना पाहायला मिळाले.