Sanjay Raut | महाबळेश्वरच्या खराब रस्त्यावरुन ‘राजे’ एकदा स्वतः फिराच : खा. संजय राऊत

महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असूनही येथील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत, ज्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे
Maharashtra politics
संजय राऊत.file photo
Published on: 
Updated on: 

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असूनही येथील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत, ज्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. याच जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खाते स्वतःकडे असूनही शिवेंद्रहराजे भोसले याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ‘राजे, एकदा महाबळेश्वरच्या खराब रस्त्यावरून स्वतः फिरा,’ असा टोला शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लगावला.

खा. संजय राऊत हे खासगी दौऱ्यानिमित्त महाबळेश्वर पर्यटनस्थळी सहकुटुंब पर्यटनासाठी आले असता पत्रकारांनी खा. राऊत यांना महाबळेश्वर कसे वाटले? असा प्रश्न विचारला असताना त्यांनी खराब रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना टोला लगावला.

ते म्हणाले, ते राजे आहेत. त्यांच्या वडील,आजोबांच्या नावाने महाबळेश्वर मध्ये उद्याने आहेत तेथे पर्यटक जातात. त्यांनी एकदा स्वतः फिरले पाहिजे, काय लोकांचे हाल होतात हे पहिले पाहिजे, असे सांगून ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर त्यांनी टीका केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, शंकर ढेबे, राजेश साळवी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.