सातारा : दोन महिन्यांत 315 दशलक्ष युनिट वीज निर्मिती

सातारा : दोन महिन्यांत 315 दशलक्ष युनिट वीज निर्मिती
Published on
Updated on

पाटण : कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या दिड महिन्यांत पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्याच कालावधीत तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना जलविद्युत निर्मिती चौथा टप्पा बंद होता. जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस सुरू झाल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाऊस, पाण्याची आवक व पाणीसाठा झाला असला तरी परिणामी गतवर्षीच्या तुलनेत 73.352 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. आता अपेक्षित पाणीसाठा झाल्याने येणार्‍या काळात ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासन सकारात्मक प्रयत्न करेल यात शंकाच नाही.

नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या दोन महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 6.56 टीएमसी पाण्यावर 303.166 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 7.96 टीएमसीवर 364.454 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 1.40 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 61.288 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे.

पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आत्तापर्यंत सिंचनासाठी सोडलेल्या 3.67 व पूरकाळात 0.90 अशा 4.57 टीएमसी पाण्यावर 11.432 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पूरकाळातील सोडलेल्या 6.84 टीएमसी पाण्यावर 23.496 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 2.27 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 12.064 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण 11.13 टीएमसी पाण्यावर 314.598 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 14.80 टीएमसी पाण्यावर 387.950 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 3.67 टीएमसी पाणीवापर कमी पाणीवापर झाल्याने यातून 73.352 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे . पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच सन 2021 सालात 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले गेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news