

कराड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्यासह संपूर्ण मोहिते - भोसले कुटुंबीयांनी भेट घेतली आहे. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या शिष्टाईने ही भेट झाली आहे.
ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ते आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असून कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.
मात्र, त्यापूर्वीच डॉ. मोहिते यांच्या शिष्टाईमुळे आमदार विश्वजीत कदम यांची संपूर्ण मोहिते - भोसले कुटुंबीयांची एकत्रित भेट झाल्याचे समोर आले आहे. डॉ. भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, आमदार अतुलबाबा भोसले, डॉ. मोहिते या सर्वांची आमदार विश्वजीत कदम यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे.