Karad Crime News: दारूसाठी १०० रूपये दिले नाहीत म्हणून भोसकून आतडेच बाहेर काढले... मलकापुरातील धक्कादायक घटना

Karad Crime News:
Karad Crime News:pudhari
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा

आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथील एका दारू दुकानासमोर शंभर रूपये न दिल्याने चिडलेल्या अनोळखी व्यक्तीने मजुरास चाकूने भोसकले. संतोष पोपट सूर्यवंशी (रा. मलकापूर) असे जखमीचे नाव असून कराड शहर पोलीस ठाण्यात अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (malkapur man stabbed for refusing hundred rupees liquor)

Karad Crime News:
Nanded Crime : नांदेडात आणखी दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला

सूर्यवंशी यांचा पैसे देण्यास नकार

संतोष सूर्यवंशी हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते दारू पिण्यासाठी आगाशिवनगरमधील एका देशी दारू दुकानात गेले होते. दुकानाबाहेरच एका व्यक्तीने सूर्यवंशी यांच्याकडे दारू पिण्यासाठी 100 रूपयांची मागणी केली. आपल्याकडे 100 रूपये आहेत मात्र आपण 50 रूपयांची दारू पिणार असून उर्वरित पैशातून मुलांना खाऊ घेणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितलं. सूर्यवंशी यांनी दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला.

Karad Crime News:
Nanded Crime | धक्कादायक : सुट्ट्यांसाठी आजोळी आलेल्या मुलावर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

त्यामुळे चिडलेल्या संशयिताने अचानकपणे चाकूने भोसकल्याने सूर्यवंशी यांच्या पोटातील आतडी बाहेर आली. अशा जखमी अवस्थेत सूर्यवंशी घरी गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news