Karad theft case: कराडात दुचाकीच्या डिकीमधून दोन लाखांची रोकड लंपास

भावाच्या लग्नासाठी ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली दोन लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

कराड : भावाच्या लग्नासाठी ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली दोन लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. शनिवार दि. 2 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मीनाक्षी शरणाप्पा तळवार (रा. शंभू महादेव नगर, गुरुकृपा अपार्टमेंट, गोळेश्वर, ता. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मीनाक्षी तळवार या भावाच्या लग्न खर्चासाठी व त्याला लग्नात भेट म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बहीण, दाजी व पतीसह कराडात आल्या होत्या. त्यांनी शहरातील कॅनरा बँकेतून पाच लाख रुपये रोख रक्कम काढली. त्यापैकी तीन लाख रुपये दाजी चंद्रकांत तळवार यांनी स्वतःकडे ठेऊन घेतले. उर्वरित दोन लाख रुपये मीनाक्षी तळवार यांनी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. ती प्लास्टिकची पिशवी त्यांनी बँकेतून बाहेर आल्यानंतर दुचाकीच्या डिकीत ठेवली.

त्यानंतर त्या बहीण शोभासह सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्समध्ये गेल्या. ज्वेलर्समध्ये त्यांनी भावासाठी सोन्याची वेढण पाहिले. काही वेळानंतर त्यांना अंगठी आवडली. तिचे बिल करण्यासाठी सांगून मीनाक्षी तळवार यांचे पती व दाजी दुचाकीची चावी घेऊन डिकीतील पैसे आणण्यासाठी ज्वेलर्समधून बाहेर गेले. त्यांनी दुचाकीची डिकी उघडून पाहिले असता पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मीनाक्षी तळवार यांना हाक मारली.

त्यावेळी मीनाक्षी व त्यांची बहिण दोघीही ज्वेलर्समधून बाहेर आल्या. त्यांनी डिकीत पाहिले असत पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोन लाखाची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news