सातारा, कराडमध्ये ए.एन.पी.आर कॅमेरे बसवा

खा. उदयनराजे : जिल्हा नियोजनमधून आवश्यक निधी देण्याच्याही सूचना
Install ANPR cameras In satara
Udayanraje BhosalePudhari File Photo
Published on
Updated on

सातारा आणि कराड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ए.एन.पी.आर कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आवश्यक तितका निधी उपलब्ध करुन द्यावा. पोलिस प्रशासनाकडून, सातारा आणि कराड शहरात येणार्‍या सर्व मार्गासह शहरातील महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मागवून वाहनांची नंबरप्लेट कॅच करण्याची क्षमता असलेले दर्जेदार ए.एन.पी.आर. कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

शाळांमध्ये कॅमेरे, अग्निशामक व्यवस्था आवश्यक

याबाबत खा. उदयनराजेंनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही शहरात केवळ 35 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्येही काही कॅमेरे बंद आहेत. बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा अ‍ॅक्सेस किंवा नियंत्रण पोलिस मुख्यालय डायल 112 येथून होत आहे. हे कॅमेरे एखाद्या घटनेची उकल करण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. सातारा आणि कराड शहरामध्ये येणारे सर्व मार्ग, महत्वाचे चौक या ठिकाणी ए.एन.पी.आर. कॅमेरे बसवण्याकरता आवश्यक तितका निधी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून द्यावा. पुढील काळात जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचनाही उदयनराजेंनी केली आहे.

Install ANPR cameras In satara
सांगली : पोलिस ठाण्याचे कॅमेरे फोडणे पडले महागात; ५ जणांना कोठडीची हवा

दैनिक ‘पुढारी’ने केला होता पाठपुरावा

दैनिक ‘पुढारी’ने सातार्‍यातील कुचकामी ठरलेल्या सीसीटीव्हीबद्दल वाभाडे काढले आहे. यासाठी ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. विटा, आटपाडी, इस्लामपूर येथे उकृष्ठ दर्जाचे सीसीटीव्ही बसवल्याचे वास्तव आहे. यामुळे तेथील चोर्‍यांवर नियंत्रण आले आहे. याउपर गुन्हेगारांसाठी सातारा सुरक्षित वाटत आहे. कोणीही यावे अन् चेन स्नॅचिंग, घरफोडी, लुटमार करुन जावे अशी परिस्थिती सातार्‍यात आहे. घटना घडल्यानंतर चांगले सीसीटीव्ही फुटेज मिळत नसल्याचे चोरट्यांनाही माहित आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. संतापजनक घडलेल्या या घटनेनंतर खराब सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे पोलिसांचा तपास लांबला होता. यामुळे सातारा शहरात व महामार्गावर चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज असल्याचे वास्तव दै. ‘पुढारी’ने मांडले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news