सांगली : पोलिस ठाण्याचे कॅमेरे फोडणे पडले महागात; ५ जणांना कोठडीची हवा

सांगली : पोलिस ठाण्याचे कॅमेरे फोडणे पडले महागात; ५ जणांना कोठडीची हवा
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही प्रणालीचे कॅमेरे दगडाने फोडणे येथील गुंडांच्या टोळीला चांगले महागात पडले. हा धक्कादायक प्रकार (शनिवार) उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुंड ज्ञानेश्वर भिमराव पवार, चेतन पांडुरंग पवार, ओंकार राजेंद्र गुरव, अजिज दस्तगीर मुल्ला, ऋतुराज भरत मुसळे (सर्व रा. इस्लामपूर) यांना गुन्हे प्रगटीकरणच्या पथकाने अटक केली. सरकारी मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचा भंग, दहशत माजवणे या कलमाअंतर्गत त्यांचावर गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर, चेतन, ओंकार, अजिज यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. ऋतुराज याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आलमगीर लतीफ हे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही सर्व्हेलियन्सचे काम पाहतात. त्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये वेगळा कक्ष करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ते सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये आले होते. त्यावेळी सरनोबत वाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेबंद व काही कॅमेऱ्यांची दिशा बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लतिफ यांनी तेथे जावून पाहिले असता, तेथील कॅमेऱ्यांची मोडतोड झाल्याचे त्‍यांना दिसले.

लतिफ यांनी कंट्रोल रुममधील व्हिडीओ फुटेजचा बॅकअप पाहिला. त्यामध्ये शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास संशयित ज्ञानेश्वर, चेतन, ओंकार, ऋतुराज, अजिज यांनी दगड मारून कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये दिसले. पाचजणांवरती जमावबंदीचा आदेश भंग करणे, दहशत माजविणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुखे, पोलिस दिपक ठोंबरे, अरुण पाटील, आलमगीर लतिफ, शरद जाधव, सचिन सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news