Gold Rate: सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण

सोन्याला १२ हजारांचा फटका : चांदीही २० हजारांनी स्वस्त
Gold Rate
Gold Rate(Pudhari Photo)
Published on
Updated on

सातारा : गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असून, सराफा बाजारात खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात एक तोळा सोन्याचा दर सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांवर होता. त्यानंतर दरात सातत्याने घट होत असून, दोन आठवड्यांत सोन्याच्या दरात तोळ्याला सुमारे १२ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात किलोला तब्बल २० हजार रुपयांची घसरण झाली आहे.

मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी सोन्याचा दर एक तोळ्यासाठी सुमारे १ लाख ५३ हजार रुपये होता. बुधवारी, दि. २ सप्टेंबर रोजी त्यात आणखी दोन हजार रुपयांची घट होऊन सोने १ लाख ५१ हजार रुपये प्रति तोळा दराने विक्री झाले. देशांतर्गत बाजारातही २ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदविण्यात आली असून, जागतिक बाजारातील दबाव त्यामागे असल्याचे दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. लग्नसराई तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दर आणखी काही दिवस दबावात राहिल्यास सराफा बाजारात खरेदीचा ट्रेंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news