Robbery Case | वृद्धेचे दागिने हिसकावणारा चोरटा जेरबंद

कळंबी (ता. खटाव) येथील 73 वर्षीय महिलेची बोरमाळ हिसकावून पोबारा करणार्‍या सांगली जिल्ह्यातील अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केले.
Robbery Case
वृद्धेचे दागिने हिसकावणारा चोरटा जेरबंदPudhari
Published on
Updated on

औंध: कळंबी (ता. खटाव) येथील 73 वर्षीय महिलेची बोरमाळ हिसकावून पोबारा करणार्‍या सांगली जिल्ह्यातील अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केले. सुधीर ऊर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. दुसरा सराईत चोरटा पसार झाला आहे.

औंध पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कळंबी ते औंध रस्त्यावरून शेतातून घरी जाताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कळंबी येथील श्रीमती सिंधू बाळासो देशमुख (वय 73) यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयाची बोरमाळ हिसकावून पोबारा केला होता.

Robbery Case
Aundh Postmortem Department: मृत्यूनंतरही थांबत नाहीये त्यांची प्रतीक्षा!

याची तक्रार सिंधू देशमुख यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली होती. सपोनि गणेश वाघमोडे यांनी पोलिस पथकासह अवघ्या बारा तासात यातील एका चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरीत प्रकाश श्रीरंग जाधव (रा. माधळमुठी ता. खानापूर) या अट्टल संशयिताचे नावही निष्पन्न झाले असून तो पसार झाला आहे. या दोघांविरोधात सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, इस्लामपूर, कोकरूड, आटपाडी, तासगाव पोलिस ठाण्यात घरफोडी व जबरी चोरीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

Robbery Case
PMC Election: ‘स्मार्ट सिटी’चा फसवा मुखवटा! औंध–बोपोडीतील सुविधा ‘अस्मार्ट’

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, सतीश मयेकर, पोलिस हवालदार चेतन सानप, दादासो देवकुळे, सुनिल गोडसे, सुखदेव बुधे, नाना कांबळे, रुपाली क्षीरसागर, यशोदा मोरे, पोलिस सचिन राऊत, मोहन कदम, रोहित खरात, ज्ञानेश्वर टिंगरे, स्वराज शिंदे, प्रमोद इंगळे, साहिल झारी, सनी लवंगारे, राहुल जाधव, मेघा फडतरे, कोमल पवार, दिपा जाधव, सुमाली मोरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news