कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळी पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांनी रविवारी दुपारी अभिवादन केले.
यावेळी कराड नगरपालिकेचे विरोधी गटनेते विजय वाटेगावकर, भाजपचे पक्ष प्रतोद तथा नगरसेवक शिवाजी पवार, कराड शहर भाजप अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष सुषमाताई लोखंडे, नगरसेविका तेजश्री पाटसकर, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, मलकापूरचे भारत जंत्रे, सुनील शिंदे, शिवराज माने, अन्वीत हुलवान, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय पाटील, कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. भीमराव शिंदे, अॅड. अश्विनी विजय पाटील, शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार, सौ. शुभांगी विनय जाधव आणि विनय निवृत्ती जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
समाधीस्थळी अभिवादन करून उपस्थितांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.