

कोरेगाव : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिता जाधव यांना बहुमताने निवडून देण्यासाठी झटून काम करावे. कोरेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक तयारी, प्रभावी नियोजन आणि समन्वयावर भर द्यावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
कुमठे येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्यास जिल्हा शिक्षक आघाडीचे संयोजक तथा माजी प्राचार्य जयवंत माने, कोरेगाव तालुका संयोजक महादेव घोरपडे, जिल्हा संयोजक रवींद्र जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष आनंदराव शिंदे, तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश घाडगे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, सरचिटणीस अमोल माने, जिल्हा परिषद सदस्य हणमंत जगदाळे, प्रशांत पवार, राजू भोसले, शिवाजी शेडगे, अभय राजे घाटगे, नवनाथ वलेकर, जवान सिंग घोरपडे, शरद भोसले, सचिन फणसे, प्रशांत संकपाळ, रतन काटकर, नितिराज जगदाळे, बापू गोळे, दीपक फाळके, केदार केंजळे, अमोल भुतकर, गणेश भोसले, अजित मदने व अजित बुधावले आदी उपस्थित होते.
डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. मतदार याद्यांची तपासणी करून गावागावांतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे, उमेदवाराची भूमिका व विचार समजावून सांगावेत आणि बूथस्तरावर प्रभावी नियोजन करावे. निलेश यादव यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मंडल पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येत असल्याचे सांगितले. आ. महेश शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना बूथस्तरावर सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील दहा दिवसांत मतदारांशी संपर्क वाढवून सौ. स्मिता जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही यादव यांनी सांगितले. प्राचार्य जयवंत माने यांनी प्रत्येक शाळा व मतदान केंद्रनिहाय नियोजन करून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आणि अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले.