कुठे स्वच्छता, तर कुठे रंगोटीला वेग

दीपोत्सवासाठी सज्जता; बाजारपेठेतही दीपोत्सवाची चाहूल
Diwali 2024
बाजारपेठेतही दीपोत्सवाची चाहूल(File photo)
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

घरोघरी दिवाळी सणासाठी सज्जता होऊ लागली आहे. कुठे साफसफाई, तर कुठे रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. सणासाठी कपडे, किराणा साहित्याची खरेदी केली जात आहे. फराळाची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे. तर चिमुकल्यांची लुडबूड टाळण्यासाठी शाळांना सुट्ट्या लागण्यापूर्वीच घरातील आवराआवरी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आकाशकंदील, पणत्या, उटणे, रांगोळी आदी साहित्यामुळे बाजारपेठेतही दीपोत्सावाची चाहूल जाणवत आहे.

Diwali 2024
यंदा दिवाळी ४ दिवस; कधी आहे लक्ष्मीपूजन, भाऊबीज? जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वत्र तयारीला वेग आला असून विशेषत: महिलावर्गाची धांदल उडाली आहे. घराची साफसफाई, तर कुठे रंगरंगोटीची कामे सुरु असून दिवाळी फराळाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. दिवाळीच्या फराळासाठी महिलांकडून घरगुती पदार्थांना प्राधान्य दिले जात असल्याने किराणामालाच्या खरेदीसह पाककलेला उधाण आले आहे. दिवाळीत आपले कौशल्य पणाला लावून स्वादिष्ट व खमंग पदार्थ तयार केले जातात. त्याची पूर्वतयारी केली जात असून चकली भाजणी, लाडू, अनारसे आदी पिठे तयार करण्यात येत आहेत. घरातील कामांमध्ये लहानग्यांची लुडबूड होत असते. परंतू महिलांना लवकर कामे उरकण्यावर भर दिला जात असल्याने कोणाचाच हस्तक्षेप नको असतो. शाळांना सुट्ट्या लागण्यापूर्वीच स्वच्छता व फराळाची पूर्वतयारी केली जात आहे, तर चिमुकल्यांची परीक्षा सुरु असल्याने त्यांना सुट्टीचे वेध लागले आहेत. कपडे, इलेक्ट्राॉनिक्स वस्तूंसह सातारा शहरात ठिकठिकाणी आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, दिवाळी किट विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतही दिवाळीची चाहूल जाणवत आहे.

Diwali 2024
MSP Hike | शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट!, गहू, हरभऱ्यासह अनेक पिकांची MSP वाढवली

मोफत सिलिंडरमुळे फराळाची गोडी वाढणार

जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच खरेदीला महागाईच्या झळा बसत आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीला आर्थिक फोडणी बसणार असली तरी लाडक्या बहिणींना तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मोफत मिळालेल्या गॅसवर लाडूसह चिवडा, चकली तळली जाणार असल्याने फराळाची गोडी वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news