सातारा : विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

जाणून घ्या काय आहेत वाहतुकीमधील बदल
Change in transport for immersion procession
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदलPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार आहेे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन दिवसांमध्ये पार्कींगबाबत सर्व सातारकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. राजपथावर कमानी हौद - देवी चौक, मारवाडी चौक- मोती चौक, कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक, मोती चौक - एम.एस.ई.बी. ऑफिस समर्थ टॉकिज - राधिका टॉकिज चौक ऐक्य प्रेस कॉर्नर - बुधवार नाका चौक- गणेश विसर्जन कृत्रिम तलाव कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ, स्टेट बँक प्रतापगंजपेठ - डि.सी.सी. बँक ते मोती तळे, मोळाचा ओढा ते शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका हे मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.

Change in transport for immersion procession
अकोला : गणेशोत्सवानिमित्त अकोल्यामध्ये वाहतुकीत बदल

बोगदा ते शाहू चौक रस्ता अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. सज्जनगड व कास पठारकडे मार्गस्थ होणारी वहने बोगदा शेंद्रे मार्गे जातील. बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व वाहने (जड व अवजड वाहने वगळून) ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालत वाडा शाहू चौक मार्गे एस.टी. स्टॅन्डकडे जातील. मोळाचा ओढाकडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर - राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे एस.टी. स्टॅन्ड कडे येणारी वाहने ही कोटेश्वर मंदिर - शाहुपुरी - मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक मार्गे एस.टी. स्टँडकडे येतील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहू चौक अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावी.

Change in transport for immersion procession
पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल, वाहनधारकांना फटका
सातारा शहरातील गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्वांनी त्याचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे. गर्दीच्या ठिकाणी सर्वांनी खबरदारी घ्यावी व मिरवणूक एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी.
-सपोनि अभिजित यादव, सातारा शहर वाहतूक.

स्थानिकांनी पर्यायी जागेत पार्किंग करावे

पार्किंगच्या व्यवस्थेबाबत गणेश विसर्जन मार्गावर राहणार्‍या नागरिकांनी आपली वाहने विसर्जन मार्ग सोडून पर्यायी जागेत पार्क करावीत. विसर्जन पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांनी आपली वाहने तालीम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news