भव्य, ऐतिहासिक, धन्यवाद सातारा; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

सातारा ; पुढारी ऑनलाईन दहिवडीत भाजपच्यावतीने अतिविराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जयकुमार गोरे यांच्या मागणीनुसार एका महिन्यात ठेंभू उपसा योजनेला दोन हजार कोटींचा निधी आम्‍ही देणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आ. जयकुमारांचे दुष्‍काळमुक्‍तीचे स्‍वप्न साकारायला आम्‍ही सर्वजण त्‍यांच्या पाठिशी आहोत, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. भाजपच्या या सभेला सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकवर पोस्‍ट करून सातारकरांचे आभार मानले.

दहिवडी येथे आयोजित भाजपच्या अतिविराट सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरसिंह साबळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील, विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रशांत परिचारक, मकरंद देशपांडे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सौ. सोनिया गोरे, अरुण गोरे, शिवाजी शिंदे, धनंजय चव्हाण, डॉ. संदीप पोळ आदींसह खटाव, माणसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या दुष्काळाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढणार आहे. जिहे-कठापूरमुळे 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आतापर्यंत ही जमीन पाण्याखाली येऊ नये, अशी विरोधकांनी व्यवस्था केली. अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. त्यांना जनतेशी, दुष्काळाशी देणेघेणे नाही, ते कसे जगतात याच्याशी देणेघेणे नाही. त्यांच्याकरिता तुम्ही फक्त व्होट बँक आहात. म्हणूनच आ. गोरे यांनी जी योजना मंजूर केली ती योजना त्यांनी अडवून ठेवली. मात्र, भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर जयाभाऊ भिडले. त्यांनी उडी सरकारमध्येही आणि पुलावरूनही घेतली; पण तुमच्या आशीर्वादामुळे त्यांना काही होणार नाही. रणजित व जयाभाऊंची ही जय-वीरूची जोडी आहे. जिहे-कठापूर योजनेचे भूमिपूजन केले याचा आनंद आहे. अडीच वर्षांनंतर आता पाणी येणार आहे.

हे पाणी डिसेंबरमध्ये येणार आहे; पण ऑक्टोबरमध्ये येणारी निवडणूक जयाभाऊ तुम्ही लढा. डिसेंबर 2024 मध्ये 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. यासाठी 370 कोटींचा निधी दिला आहे. योजनेसाठी पैशाची कमतरता भासूू देणार नाही, असा शब्दही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news