Ajit Pawar ashes immersion: स्वत: लावलेल्या झाडाच्या मुळाशी अजितदादांच्या अस्थी विसर्जित

कैलास स्मशानभूमीतील पिंपळ ठरले जिवंत स्मारक : 2023च्या आठवणी जागृत
Ajit Pawar ashes immersion
Ajit Pawar ashes immersionPudhari
Published on
Updated on

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिचे विसर्जन कैलास स्मशानभूमीत स्वतः दादांनी लावलेल्या झाडाच्या मातीत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी केले. अजितदादांनी 2023 मध्ये लावलेल्या झाडालाच या अस्थी विसर्जित करण्यात आल्याने अजितदादा झाडाच्या अन्‌‍ कामाच्या माध्यमातून अजरामर झाले आहेत.

श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साताऱ्यात उभारण्यात आलेल्या कैलास स्मशानभूमीच्या कामासाठी स्व. अजितदादा पवार यांनी सढळ हाताने मदत केली होती. त्यांचे आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांचे जुणे ऋणानुबंध होते. 2023 मध्ये अजितदादांनी कैलास स्मशानभूमीला भेट दिली होती. तेव्हा या ठिकाणी पिंपळाचे झाड त्यांच्या हस्ते लावण्यात आले होते. त्याच डेरेदार झाडाला राजेंद्र चोरगे यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या काही अस्थी मंगळवारी अर्पण करण्यात आल्या.

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व गावागावात पोहचल्या असून त्या अस्थींचे दर्शन घेताना दादांच्या हितचिंतकांचा शोक अनावर झाला. त्यांचे सर्वांवर असलेले नितांत प्रेम, असाच प्रेमाचा ओलावा राजेंद्र चोरगे यांना कर्मधर्म सहयोगाने लाभला म्हणून सातारची स्मशानभूमी मुहूर्त रुपात साकारली. अन्यथा अनेक अडचणींवर मात करताना चोरगे यांना मोठी कसरत करावी लागली असती. पण अजितदादा यांचा चोरगेंवरचा दांडगा विश्वास या समाजोपयोगी कामात कामी आला.

आज बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राजेंद्र चोरगे यांनी दादांनी स्मशानभूमीत लावलेल्या अनेक रोपांचे आज वृक्ष झाले आहेत, त्याच वृक्षाच्या मातीत दादांचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी त्यांच्या अस्थिंचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, अमित कदम, राजेंद्र लवंगारे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, झाडाला अस्थी वाहून झाल्यानंतर त्या अस्थी नंतर कृष्णा वेण्णा संगम दक्षिण काशी येथेही विसर्जित करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news