सातारा : जनावरे वाहतूक करणारा ट्रक फोडला

बजरंग दलाच्या कार्यकर्ते आक्रमक
Animal Smuggling truck Caught
जनावरे वाहतूक करणारा ट्रक फोडलाSatara news
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटादरम्यान अडवले. यावेळी एका ट्रकची तोडफोड करण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Animal Smuggling truck Caught
सातारा : महामार्ग बनलाय मृत्यूचा जबडा

अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील दोन ट्रक हे सातारच्या हद्दीत सायंकाळी 6 च्या सुमारास दाखल झाले. संबंधित ट्रक हे वाढे फाटा ते खेड फाटा यादरम्यान असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते थांबवले. ट्रकमध्ये जनावरे वाहतूक सुरू असल्याने वाहतूक करणार्‍या वाहन चालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्यावर या चालकाने उलट उत्तरे दिल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत (एमएच 12 जेएफ 2828) हा ट्रक फोडला. यावेळी महामार्गावर ट्रॅफिक जाम होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा तणाव निवळला व वाहतूक सुरळीत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news