सातारा : जिल्ह्यातील धरणांत ४१ टक्के पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यातील धरणांत ४१ टक्के पाणीसाठा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील धरणांत ४१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्याच्या काही भागांत सध्या पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. पावसाळा सुरू होऊन महिन्याचा कालावधी लोटला, तरी धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. पावसाने ओढ दिल्याने मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पांमध्ये 41.02 टक्केच पाणीसाठा झाला आहे. मोठे व मध्यम धरण प्रकल्प भरण्यासाठी 114.13 टीएमसीची गरज आहे.

जिल्ह्यात मान्सूनने आठ दिवस लवकर हजेरी लावली होती. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगली सुरुवात केली. पंधरा दिवसांत छोटे तलाव भरले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने चकांदळ केली असताना पूर्वोत्तर भागातील तालुक्यांत मात्र भीषण चित्र पाहायला मिळत आहे. खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यात पावसाची आवश्यकता आहे.

गेल्या महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पेरण्या रखडल्या होत्या. पेरणीनंतर उगवलेल्या पिकांना पुरेसा पाऊस आवश्यक होता; मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ठाकले होते. आता पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला. गेल्यामहिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरण प्रकल्पांमध्ये सुमारे 7-8 टीएमसी पाणीसाठा झाला. मात्र त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पाण्याची पुरेशी आवक झाली नाही. त्यामुळे मोठे प्रकल्पांमध्ये निम्माही पाणीसाठा झालेला नाही.

सध्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 44.94 टक्केपाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी 41.52 टक्के पाणी आहे. मोठे प्रकल्प भरण्यासाठी अजून 77.56 टीएमसीची आवश्यकता आहे. निरा-देवघर 3.53 टीएमसी, भाटघर 5.65 टीएमसी, वीर 3.84 टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील 10 मध्यम धरण प्रकल्प भरण्यासाठीही पावसाची आवश्यकता आहे. ही धरणे 38.06 टक्के भरली असून त्यामध्ये 3.6 टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे. ही धरणे भरण्यासाठी अद्याप 4.6 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील लघू प्रकल्प 41 टक्के भरले आहेत.

मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी 0.04 टीएमसी, नेर 0.10 टीएमसी, राणंद 0.05 टीएमसी, आंधळी व नागेवाउी प्रत्येकी 0.09 टीएमसी, मोरणा (गुरेघर) 1.08 टीएमसी, उत्तरमांड 0.53 टीएमसी, कुडाळी महू 0.38 टीएमसी, कुडाळी हातगेघर 0.08 टीएमसी, वांग (मराठवाडी) 0.63 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.मोठे आणि मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण 79.39 टीएमसी पाणी असून त्याची 41.02 इतकी टक्केवारी आहे. मोठे आणि मध्यम प्रकल्प भरण्यासाठी अजून 114.02 टीएमसीची आवश्यकता आहे.

कोयना धरणात 49.16 टीएमसी पाणीसाठा
पाटण ः पुढारी वृत्तसेवा
कोयना धरणांतर्गत विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने धरणात सरासरी 16,863 क्युसेक पाण्याची आवक होत आहे . या पाण्यामुळे गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 1.53 टीएमसीने, तर पाणी उंचीत 1.9 फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 49.16 टीएमसी इतका झाला आहे.

धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातूनप्रतिसेकंद सरासरी 16,863 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. या पाण्यामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. धरणाची सध्याची स्थिती लक्षात घेता येथे एकूण पाणीसाठा 49.16 टीएमसी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 44.04 टीएमसी, पाणी उंची 2106.3 फूट, जलपातळी 641.98 मिटर इतकी झाली आहे.

गेल्या चोवीस तासात व एक जून पासून आतापर्यंत झालेला एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे कोयना 26 मिलिमीटर (1229), नवजा 65 मिलिमीटर (1680), महाबळेश्वर 36 मिलिमीटर (1727) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news