Satara Lok Sabha : घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर आणखी एक गुन्हा दाखल होणार: नरेंद्र पाटील | पुढारी

Satara Lok Sabha : घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर आणखी एक गुन्हा दाखल होणार: नरेंद्र पाटील

कराड : पुढारी वृत्तसेवा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुतारी घोटाळ्यात आमदार शशिकांत शिंदे अडकले आहेत. त्यांनी या गुन्ह्यात चार महिन्यांपूर्वीच जामीन घेतला आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच एफएसआय घोटाळ्याप्रकरणी आणखी एक गुन्हा त्यांच्यासह काही संचालकांवर दाखल होणार असल्याचे माजी आमदार तथा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. Satara Lok Sabha

नरेंद्र पाटील म्हणाले आहे की, सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी बेंबीच्या देठापासून ओरडत माझ्या निवडणुकीत विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे या निवडणुकीनंतर आता मला त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची संधी मिळाली आहे. आम्ही सर्वांनी 1999 साली त्यांच्या पहिल्या निवडणुकीसह त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत ते विजयी व्हावेत, यासाठी जीवाचे रान केले होते. Satara Lok Sabha

मात्र, त्यांना सर्व पदे आपल्यालाच हवी आहेत. माथाडी कामगार कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करत नाहीत. जे राजकीय पक्ष माथाडींचे प्रश्न सोडवतात, त्यांना माथाडी कामगार निवडणुकीत सहकार्य करतात, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button