सातारा : ज्ञानदेव रांजणे यांना सकाळी चंद्रकांतदादांची तर दुपारी आ. महेश शिंदेंची मिठी | पुढारी

सातारा : ज्ञानदेव रांजणे यांना सकाळी चंद्रकांतदादांची तर दुपारी आ. महेश शिंदेंची मिठी

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : जावळी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या ज्ञानदेव रांजणे यांचा सोमवारी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर बोलबोला झाला. सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार केला. यावेळी पाटलांनी रांजणेंना मिठी मारली तर दुपारी कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही रांजणेंना मिठी मारुन त्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर ज्ञानदेव रांजणे यांचे नाव राजकीयद़ृष्टया चांगलेच चर्चेत आले आहे. सोमवारी सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील रांजणेंचे त्यांच्या घरी जावून कौतुक केले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली.

या भेटीनंतर आ. शशिकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक व शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीदेखील ज्ञानदेव रांजणे यांना कडकडून मिठी मारली. चंद्रकांतदादा व आ. महेश शिंदे यांची रांजणे यांना अभिनंदनाची मिठी या दोन्ही राजकीय घडामोडींची सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती.

हेही वाचलत का?

Back to top button