सातारा : वाईन शॉप परवान्याच्या आमिषाने 75 लाखांना चुना

file photo
file photo
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयातील सचिव, अधिकारी यांची ओळख असल्याचे सांगून सातार्‍यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाईन शॉप परवाना मिळवून देतो, असे सांगून बंटी-बबलीने फसवले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विनायक शंकर रामुगडे व कलावती रामचंद्र चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी घनशाम चंद्रहार भोसले (वय 47, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

घनशाम भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 2017 मध्ये त्यांचे मित्र तानाजी निकाळजे यांच्याद्वारे रामुगडे व चव्हाण यांची ओळख झाली. यातूनच त्यांना असे समजले की मंत्रालयातील अधिकारी ओळखीचे असून बदलीची कामे, फाईल मंजूर करणे व वाईन शॉप बारची लायसन्स ट्रान्स्फर शिफ्टींगची कामे ते करतात. तक्रारदार भोसले व रामुगडे यांची मैत्री झाल्यानंतर 2018 साली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने तेथील दोघांची वाईन शॉपची लायसेन्स विकायला आली आहेत. ती तुम्ही घ्या, तुमचा फायदा होईल असा आग्रह रामुगडे याने भोसले यांच्याकडे धरला.

चंद्रपूर येथील वाईनचे लायसन 2 कोटी 50 लाख रुपयांना द्यायचे ठरले. त्यानुसार तक्रारदार भोसले यांनी रोख 3 लाख रुपये रामुगडे व कलावती चव्हाण या दोघांकडे गोडोली येथे राहत असलेल्या ठिकाणी दिले. यानंतर बँकेच्या आरटीजीएसद्वारे 10 लाख व पुन्हा रोख 20 लाख रुपये वेळोवेळी दिले. पैसे दिल्यानंतर लायसन नावे करण्यासाठी तक्रारदार भोसले यांनी पाठपुरावा केला. मात्र, फाईल मंत्रालय प्रोसेसमध्ये आहे, ऑर्डर लवकर होईल, असे सांगून वेळ घेतला. यानंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन उचलण्याचे बंद केले. यामुळे तक्रारदार भोसले यांनी गोडोली येथील फ्लॅटवर जाऊन पाहिले असता तो बंद दिसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news