ऊस उत्पादनात झालेली घट, इथेनॉलकडे कारखान्यांचा वाढलेला ओढा व केंद्र सरकारचे धरसोड वृत्तीचे धोरण यामुळे साखर उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी राज्यात 1300 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. हंगामाच्या सुरूवातीला दुष्काळामुळे 900 लाख क्विंटल साखर उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, हंगाम सुरू होवून तीन महिन्यानंतरही 600 लाख क्विंटल साखरही तयार झालेली नाही. आणखी महिनाभर हंगाम सुरू राहणार असून अंदाजित उत्पादनही होणार नसल्याचे वास्तव आहे.