सातारा जिल्हा बँक : इतर मागास प्रवर्ग मतदार संघ-विधातेंविरुद्ध गोरे कडवी झुंज देणार का? | पुढारी

सातारा जिल्हा बँक : इतर मागास प्रवर्ग मतदार संघ-विधातेंविरुद्ध गोरे कडवी झुंज देणार का?

सातारा : पुढारी वृत्तसेवा

ओबीसी मतदार संघात प्रदीप विधाते व शेखर गोरे यांच्यातील लढाई एकतर्फी होणार की कडवी होणार याविषयी उत्सुकता आहे. शेखर गोरे सोसायटी मतदार संघात ताकदीने लढत असल्याने ओबीसी मतदार संघात ते कडवी झुंज देणार का? यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून आहे.

ओबीसी मतदार संघातील जागा बिनविरोध करण्यासाठीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी प्रयत्न केले. त्यासाठी शिवसेनेच्या शेखर गोरेंना अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावर शेखर गोरेंनी माण सोसायटी मतदारसंघातील राष्ट्रवादीची उमेदवारी मागे घेण्याची अट घातली. या डीलमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी मतदार संघासह आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती तरीही सहकार पॅनलकडून शेखर गोरेंची मागणी धुडकावण्यात आली. परिणामी विधाते आणि गोरेंमधील लढत फायनल झाली.

ओबीसी मतदारसंघातील जागेसाठी जिल्ह्यातून एकूण 1964 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी बहुतांश मतदान हे सहकार पॅनलकडे आहे. विधाते हे विद्यमान संचालक असल्याने त्याचा फायदा त्यांना होणार आहे. अजितदादांनीच त्यांची उमेदवारी फायनल केल्याने राष्ट्रवादीही त्यांच्या पाठीशी आहे. तरीही पॅनलच्या प्रचारात सक्रीय सहभागी होत आहे. तर दुसरीकडे वैयक्तिक गाठी भेटीही घेत आहेत.

त्या तुलनेत शेखर गोरेंचे वलय हे माण व खटाव तालुक्यात आहे. याचबरोबर त्यांना बंधू आ. जयकुमार गोरे यांची साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही सोबत घेत ते निवडणूक लढवत आहे. शेखर गोरेंना माण सोसायटी मतदारसंघासह ओबीसी मतदारसंघात लढत आहेत. शेखर  गोरे ओबीसी मतदार संघात विधातेंना टक्कर देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Back to top button