परीक्षा सातारा झेडपीची; पेपर नागपूरला

file photo
file photo
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्र, औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा दि. 21 व 26 डिसेंबर रोजी होत असून परीक्षार्थींना सातारा सोडून राज्यातील मुंबई, नागपूर, नांदेड अशी केंद्रे आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची राज्यभर फरफट सुरू आहे. त्यांना प्रवासाचा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागावले होते. त्यानुसार काही संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. तर काही संवर्गाच्या परीक्षा अद्यापही सुरू आहेत. त्यानुसार औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा दि.21 व 26 डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना हॉल तिकीट आले आहे. संंबंधित उमेदवारांना परीक्षा केंद्र मुंबई येथे आले आहे. परीक्षार्थी उमेदवार सातारचा रहिवासी असून त्याने सातारा जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारी पदासाठी अर्ज केले असताना त्याचे परीक्षा केंद्र मुंबई आले आहे. तर काहींना नांदेड, नागपूर, औरंगाबाद अशी परीक्षा केंद्रे आली असल्याने संबंधित परीक्षा घेणार्‍या यंत्रणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

तसेच विविध संवर्गाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क 1 हजार रुपये आकारण्यात आले आहेत. त्यात मुंबईला परीक्षा केंद्र आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक उमेदवारांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत प्रशासनाने काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news