सातारा : किल्ले प्रतापगडावर आज मशाल महोत्सव

सातारा : किल्ले प्रतापगडावर आज मशाल महोत्सव
Published on
Updated on

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : किल्ले प्रतापगडावरील आई भवानी मातेच्या स्थापनेला यावर्षी 364 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त शुक्रवार, दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता किल्ले प्रतापगडावर 364 मशाली प्रज्वलित केल्या जाणार आहेत. या मशाल महोत्सवात राज्यभरातील हजारो शिवभक्तांची उपस्थिती राहणार आहे. फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीने प्रतापगडावर शुक्रवारी साक्षात शिवकाळ अवतरणार आहे.

किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाने ओळखला जात असून, तो साक्षात आई भवानीच्या प्रतिष्ठापनेनेही पावन झालेला हिंदवी स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण गड आहे. छत्रपती शिवरायांनी भोरप्याच्या डोंगराला तट बरुजांचे शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालून आलेल्या उन्मत अफजलखानाचा येथेच कोथळा काढला होता. या घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासाला एक नवी कलाटणी त्याकाळी मिळाली. हा भीम पराक्रम जिच्या कृपाशिर्वादाने प्रत्यक्षात आला तिचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी आदिशक्तीची स्थापना केली. अशा या प्रतापगडनिवासिनी आई जगदंबेच्या स्थापनेला 2010 साली 350 वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून प्रतापगडावरील स्थानिक भुमिपुत्र चंद्रकांत उतेकर यांच्या कल्पनेतून प्रतापगडावर प्रथम 2010 साली 350 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.यावर्षी 364 मशाली प्रज्वलित होणार आहेत.

महोत्सवासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा

प्रतापगडावर दरवर्षी भवानी मातेचा नवरात्रौत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. याच उत्सवात चतुर्थीच्या रात्री 8 वा. शेकडो मशाली एकाच वेळी प्रज्वलित केल्या जातात. जवळजवळ 8 ते 10 दिवस अगोदर मशाल महोत्सवाच्या तयारीचे काम सुरू होते. असंख्य लोक या कामात आपला खारीचा वाटा उचलतात. मशाल महोत्सवाच्या निमित्ताने मशाली प्रज्वलन, ढोल-ताशा समूह वादन, फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी यामुळे हा सोहळा दिमाखदार होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news